छत्रपती संभाजीनगर :
दिल्लीत जंतर-मंतर येथे सोमवारी (20 जलै) नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आणि केंद्रीय शिक्षणमंत्री
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केल्याने हे आंदोलन हिंसक बनले. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
तर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी या बंदला सहकार्य करून सहभागी व्हावे, असे आवाहन केल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
Maharashtra bandh called by Vanchit Aghadi tomorrow