राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन

राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : प्रतिनिधी
‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांचे प्रमुख नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. तीन तास चाललेल्या या हायव्होल्टेज आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना ताब्यात घेतले.
नीट पेपरफुटीप्रकरणी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
सोमवारी या आंदोलकांनी संसदेवर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीमारामुळे देशभरातील तरुण आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली. याच लाठीमाराचा आणि सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ‘सपा’प्रमुख अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान निवासाकडे जोरदार आंदोलन केले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम
पंतप्रधान निवासाबाहेर रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या शिक्षणमंत्र्यांची तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. विरोधकांच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली पोलीस आणि प्रशासनाची मोठी पळापळ झाली. अखेर 3 तासांच्या हायड्राम्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, अखिलेश यादव आणि इतर प्रमुख नेत्यांना व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतले.

सरकार जनतेला उत्तरदायी : शरद पवार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजित दीपके यांची भेट घेतली. त्यांनी एक्स मीडियात पोस्ट करून म्हटले, नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतर-मंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले आहे. सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा. तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी.

राहुल गांधींची साडेतीन तासांनंतर सुटका

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची साडेतीन तासांनंतर सुटका करण्यात आली. पोलिसांनी त्यांना छत्रसाल पोलीस ठाण्यात नेले होते. त्यांच्यासोबत ताब्यात घेतलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही नंतर मुक्त करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर दोन तासांचा कालावधी झाल्यानंतर सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या नाकाला दुखापत झाल्याची माहितीदेखील देण्यात
आली आहे.

सरकार जनतेला उत्तरदायी : शरद पवार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजित दीपके यांची भेट घेतली. त्यांनी एक्स मीडियात पोस्ट करून म्हटले, नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतर-मंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले आहे. सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा. तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी.

वांगचुक यांना बाहेर पडण्याची परवानगी नाही

’एम्स’च्या डॉक्टरांनी अशा वृत्तांबद्दल चिंता व्यक्त केली की, वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्याची इच्छा दर्शवूनही वांगचुक यांना रुग्णालयातून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली. संघटनेने नमूद केले की, जर ही वृत्ते खरी असतील तर ती रुग्णाचे स्वायत्त, संमती आणि वैद्यकीय नीतिशास्त्राची प्रस्थापित तत्त्वे यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात. स्वतःला एक अ-राजकीय संघटना असल्याचे सांगत ‘आरडीए’ने म्हटले की, प्रत्येक व्यक्तीला शांततापूर्ण निदर्शनाचा लोकशाही अधिकार आहे आणि रचनात्मक संवादाद्वारे वाजवी चिंतांचे निवारण केले जाणार, अशी आशा व्यक्त केली. रुग्णालयात दाखल करण्याच्या मुद्द्यावर सर्वांत तीव्र आक्षेप निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून आला आहे, जिथे वांगचुक यांना दाखल करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र
दिल्लीतील जंतरमंतर येथे ’नीट’ पेपरफुटी आणि परीक्षांमधील इतर गैरप्रकारांवरून ’कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही प्रत्यक्ष जंतरमंतरवरील आंदोलकांची संख्या वाढत असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोनम वांगचुक यांची रुग्णालयातून सुटका आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई, या तीन प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे, या आंदोलनात उपोषणास बसलेले नेते सोनम वांगचुक यांची प्रकृती उपवासामुळे खालावली असून, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीने आणि सरकारी डॉक्टरांच्या अटी-शर्तींच्या अधीन राहून सफदरजंग रुग्णालयातून ’मेदांता’ रुग्णालयात हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
संसदेत तीव्र पडसाद; कामकाज ठप्प
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी, मंगळवारी, ’नीट’ परीक्षा पेपरफुटी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेल्या विरोधकांच्या प्रचंड भडिमारामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. सोमवारी, पाहिल्या दिवशी, दिल्लीत पेपरफुटीविरोधात आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि अश्रूधुराच्या वापराचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. यामुळे सरकारची प्रचंड कोंडी झाली. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. त्याचवेळी, लोकसभेत काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल आणि मणिकम टागोर यांनी देशातील परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पेपरफुटीच्या 152 घटना आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या. तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणावर सभागृहात स्वतःहून निवेदन द्यावे आणि यावर सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी जोरदार मागणीही विरोधकांकडून करण्यात आली.
तरुणांच्या भविष्याशी तडजोड नाही!
अश्रुधूर सोडण्यात आला आणि त्यांना पिटाळून लावण्यात आले.
सीजेपीच्या वतीने सरन्यायाधीश सौरभ दास आणि आशुतोष राका यांनी जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांनुसार, दोघांमध्ये दोन फेर्‍यांची चर्चा झाली, परंतु सरकारने आंदोलकांच्या कोणत्याही मागण्यांबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. मात्र, नड्डा यांनी आंदोलकांना धरणे आंदोलन संपवून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पेपरफुटीच्या घटना पुन्हा घडू नयेत!
किरेन रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी पेपरफुटीच्या मुद्द्यावर सविस्तर बोलले. खासदारांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुन्हा पेपरफुटी होता कामा नये. तसेच, कोणत्याही विद्यार्थ्याच्या भविष्यावर परिणाम होऊ नये. पेपरफुटीमध्ये सामील असलेल्या आरोपींना कठोरतम शिक्षा देण्याबद्दलही पंतप्रधान मोदी बोलले आहेत. किरेन रिजिजू पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी एनडीएच्या खासदारांना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये म्हणून री-नीट परीक्षेला प्राधान्य देण्यात आले आणि निकाल विनाविलंब जाहीर करण्यात आला.

पेपरफुटीवर पाच मिनिटे बोलले पंतप्रधान

पंतप्रधान मोदींनी मंगल मिलन सभेत खासदारांना संबोधित करताना नीट पेपरफुटीवर सुमारे पाच मिनिटे आपले मत मांडले. यावेळी त्यांनी खासदारांना सांगितले की, आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई केली जात आहे. पेपरफुटी प्रकरणात सामील असलेल्या आरोपींना सोडले जाणार नाही. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य विद्यार्थ्यांच्या संसद मोर्चाच्या दुसर्‍याच दिवशी आले आहे.

 

 

Capital heats up! Protest outside the Prime Minister’s residence.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *