गणेशोत्सवाला 50 दिवसांचा अवधी, मूर्ती निर्मितीला वेग

महागाईमुळे बाप्पा 30 ते 40 टक्क्यांनी होणार महाग

नाशिक : अश्विनी पांडे
यंदाच्या गणेशोत्सवाला अजून 50 दिवसांचा अवधी असून, शहरासह जिल्ह्यातील गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये आतापासूनच मोठा उत्साह आणि लगबग पाहायला मिळत आहे. आगामी काळात ऐनवेळी होणारा ऑर्डर्सचा ताण टाळण्यासाठी मूर्तिकारांनी विविध आकारांच्या सुरेख गणेशमूर्ती घडवण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. सध्या शहरातील विविध कार्यशाळांमध्ये मूर्तींना आकार देणे, वाळवणे, रंगकाम आणि अंतिम फिनिशिंगची कामे अंतिम टप्प्यात असून, कारागीर दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रत्येक मूर्तीमागे सुमारे 50 ते 100 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. एकूण दरांचा विचार केल्यास मूर्ती 30 ते 40 टक्क्यांनी महागणार आहेत. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तापासून घरगुती गणेशमूर्तींच्या अधिकृत बुकिंगला सुरुवात होणार आहे. 4 इंचांपासून ते 2 ते 2.5 फुटांपर्यंतच्या लहान व मध्यम आकाराच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी दरवर्षीच असते.

शाडू मातीची वाढती पसंती

♦ पर्यावरणपूरक शाडू मातीकडे वाढता कल
♦ गेल्या काही वर्षांत नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल जागरूकता ♦ वाढल्याने शाडू मातीच्या मूर्तींना पसंती मिळत आहे.
♦ 100 टक्के इको-फ्रेंडली शाडू मातीची मूर्ती 100 टक्के पर्यावरणपूरक असते.
♦ झटपट विसर्जन – ही मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर अवघ्या 1 ते 2 तासांत सहज विरघळते.

50 days to Ganeshotsav; idol making gathers pace.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *