माझ्या पांडुरंगाची वारी

– कविता कासार

माझ्या पांडुरंगाची या वेळेसची वारी म्हणजे भक्तांसाठी परीक्षाच होती. भक्तांच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल असतो. या वेळेसची वारी म्हणजे जणू विठ्ठलाने भक्तांची खरी परीक्षाचं घेतली. अलीकडे आणि पलीकडे नदी भरली होती चंद्रभागा आणि जणू भक्त विठ्ठल माउलीचा धावा करत म्हणत होते की अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. वारीत अनेक लहान बाळांचे वेगवेगळे वेश परिधान केलेले दर्शन म्हणजे जणू माउलीचे दर्शन घडले.
पावसाची भुर भुर, टाळ-मृदंगाचा नाद आणि सगळे शिस्तीत चालतात. सगळे पाऊले शिस्तीत रांगेत शिस्तीने चालताना दिसतात. इथे कुणी लहान-मोठे नाही. इथे कुठलेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही. या वारीत सगळे फक्त माउली असतात. कुठलाही भेद नाही राग, लोभ, मोह, माया, मत्सर न करता कसे एकमेकांना मदत करत असतात. एकमेकांना वारीत सांभाळतात. काळजी घेतात.
इथे वारीत फक्त माणुसकीचं त्या माउलीशी या माउलीचे प्रेमाचे माणुसकीचे नाते असते. माउली माउली म्हणत सगळे लहान-मोठे, थोर मंडळी अख्खा गड सफर एकत्रतपणे करतात.
कुणाला कुणाचा साधा धक्काही लागत नाही. कुणी चिमूटपणे तंबू कुठे स्वयंपाक बघतात आणि चोकदाराची एक हाक सगळी शिस्त कशी त्या एका इशार्‍यावर मोकाट उभी असते. इथे सगळे माउली असतात. माणसाने सगळा अहंकार कसा वेशीवरचं जर टांगला तर त्यांची पाऊले कशी एकाच दिशेने ऐकाच लईत पडतात याचं जिवंत उधारण म्हणजे आपली माउलीची वारी जगातली सगळ्यात मोठी.
मॅनेजमेंट सिस्टिम कुठल्या पुस्तकात नाही. तर त्या चंद्रभागेच्या वाळवंटातच विसावलीय नाही का?
आज हरपलं देह भान
जिवं झालाय येडा खुळा….
पाहिला तुझ्या लोचनात
भाबड्या लेकरांचा लळा….
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली….
तुझे नाम ओठी तुझे रूप ध्यानी..
जीवाला तुझी आस कां लागली…
जरी बाप तु सार्‍या जगाचा….
तरी तु आम्हा लेकरांची विठुमाउली…
या गाण्याने डोळ्यात अश्रूंच्या धारा आल्याशिवाय राहत नाही. सार्‍या जगातल्या माउलींना हाच संदेश सारा अहंकार सोडा…बरोबर न्यायची कुणाला सोय नाही. विठ्ठल वारीच्या आनंदासारखं सुख या जगात कुठलंच नाही.
मी तर म्हणते जे माउली भक्त वारीत सहभागी होतात. पायी चालून एवढी वारी करतात. तेच भक्त या जगातले सर्वांत श्रीमंत आहे. कारण या आनंदासारखं सुख तर संसारात नाहीच मुळी. पैशापेक्षा माझ्या माउलीचे सुख मोठे आहे या जगात. जगातला सर्वांत मनाने श्रीमंत देव म्हणजे माझा विठ्ठल आहे. कारण तो गरिबाचा आहे. पण दुःख हेच वाटते की, या विठ्ठलाला जगातल्या लोकांनी पैशाने वंचित ठेवलेय, कारण विठ्ठलाला खूप कमी दान केले जाते. जगातल्या सर्वांना हेच सांगणे आपण सगळ्यांनी या गरीब वारकर्‍यांसाठी
आपल्या विठ्ठल माउलीला जास्तीत जास्त दान करूया! म्हणजे वारकर्‍यांसाठी ते दान उपयोगी पडेल नाही का!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *