गोदावरीला पूर, जुन्या नाशकात घरांची पडझड

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली असून, ‘गंगापूर’सह प्रमुख धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले असून, संपूर्ण यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. दरम्यान, जुन्या नाशकात अनेक घरांची पडझड झाली.
गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. गंगापूर, दारणा, कडवा, पालखेड, पुणेगाव, गौतमी-गोदावरी आणि अन्य धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. रामकुंड, रामसेतू, गोदाघाटावरील मंदिरे आणि दुतोंड्या मारुती परिसर पाण्याखाली गेला आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत त्र्यंबकेश्वर येथे 194 मिमी, नाशिक शहरात 132 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, इंदिरानगर, प्रसाद सर्कलसह विविध भागांत झाडे उन्मळून पडली. व्यापारी, पथविक्रेते आणि लहान व्यावसायिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला.
गिरणा नदीच्या पुराचा धोका लक्षात घेऊन मालेगाव तालुक्यातील 16 घरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भरपाई दिली जावी. विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नये. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार्‍या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सीजेपी केलेली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व खासदारांची त्यांच्या निवास्थानी बैठक बोलावली आहे. काँग्रेसनं देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न काँग्रेसकडून मांडण्यात आला. काँग्रेसकडून छात्रों की गुंज याचा पुढील कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून 26 जुलैला संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्तपणे उद्या सायंकाळी 5 वाजता राष्ट्रगीत गायन केले जाणार आहे.

Godavari floods; houses collapse in Old Nashik.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *