जंतर-मंतरचा ‘मंतर’

– राजेश शिरभाते
न्यूटनचा नियम आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक क्रियेला त्यापेक्षाही जोरदार अशी प्रतिक्रिया असते. गेल्या काही दिवसांत भारताच्या तरुण पिढीने जंतर-मंतरवरील आंदोलनात याचा प्रत्यय दिला. गेल्या बारा वर्षांपासून खोट्या प्रचाराच्या जाळ्यात अडकल्यासारख्या वाटणार्‍या देशाच्या सुशिक्षित, विचारी आणि खर्‍या राष्ट्रभक्त तरुणांनी देशात स्वतःच स्वतःला चाणक्य समजून घेणार्‍या लोकांना धडा दिला.

जगात केवळ चाणक्य हा एकच विचारवंत नसून, सॉक्रेटिस, प्लुटोपासून ते थेट महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखेही विचारवंत होऊन गेले. त्यांचाच संदेश आम्ही पुढे घेऊन जाणार हेही त्यांनी सध्याच्या चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीवर टिकलेल्या सरकारला दाखवून दिले. त्यानंतर देशात विविध पातळ्यावर जो आक्रोश आणि जो राग लोकांनी व्यक्त केला आहे. तो पाहता सरकारी यंत्रणा हाताशी धरल्या नसत्या तर त्यांचे सरकार तरी असते का, असा प्रश्न पडावा. या सरकारी यंत्रणाही इतक्या हातात आहेत की, लंडनवारीमुळे त्यांना देशातील तरुणांवर झालेला अन्याय पाहायलाही वेळ नाही.
नीट आणि इतर गेल्या बारा वर्षांत झालेल्या अनेक पेपरफुटीच्या संदर्भात क्रॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर एक आंदोलन छेडले. हे आंदोलन गेल्या बारा वर्षांत देशातील शिक्षणव्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, त्याविरोधात देशातील सध्याचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होते. हे आंदोलन गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू होते. त्याकडे लक्ष द्यायचे नाही हे सरकारचे धोरण होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा संघाला घ्यायचा नाही, कारण ते त्यांच्याच अजेंडावर काम करतात. तर मोदींकडे त्यांचा राजीनामा मागण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे सरकारने काही दिवस हे आंदोलन चालेल आणि नंतर ते संपेल या पद्धतीने त्या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष कले. आंदोलनातून आपल्याला काय हवे आहे हे या मुलांनी आधीच ठरवले होते. या देशात सत्ताधार्‍यांमधील तथाकथित चाणक्यांनी आतापर्यंतच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद दिला, हेही त्यांना माहीत होते. सरकारने तीच पावले उचलली. मुले तयार होती. या मुलांचे जंतर-मंतरच्या आंदोलनाचे खाणेपिणे बंद करायचे, हा भाजपाचा नेहमीचा अजेंडा आहे. मुंबईतील मराठा आंदोलनातही हेच वापरण्यात आले होते. या मुलांना देशातील वेगवेगळ्या भागातून चक्क स्वीगी आणि झोमॅटोवरून जेवण पाठवण्यात आले. ते इतके की नंतर त्यांनी आवाहन केले की आता पाठवू नका. सरकारने यातही आपली तथाकथित विचारसरणी दाखवून दिली. गेल्या काही दिवसांमध्ये झोमॅटो व स्वीगीला तिथे ऑर्डर घेण्यावर बंदी घातली. या मुलांची रसद तोडण्यासाठी सरकारने जागोजागी जॅमर लावले. जेणेकरून मुलांना इतरांशी संपर्क साधता येणार नाही. तिथे सरकारी यंत्रणेद्वारे साफसफाईही करण्यात आली नाही. सरकारच्या बाजूची सारी स्वतःला फार मोठी समजणारी माध्यमे हे आंदोलन बदनाम करण्यासाठी सज्ज होती. त्यांनी या आंदोलनाला पाकिस्तानातून आर्थिक मदत होत असल्याची त्यांची नेहमीची टेप लावायला सुरुवात केली होती. या सार्‍या दडपशाहीला मग आंतरराष्ट्रीय पातळीवरही काम करणार्‍या आणि अनेक वर्षे शिक्षणाचा हक्क नाकारल्यानंतर हक्क मिळालेल्या मुलांनी एक एक करून उत्तर द्यायला सुरुवात केले.
जेवण तोडले, त्यानंतर दिल्लीतील अनेक मुस्लिम बंधू आणि शीख बंधूंनी या मुलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. सरकार या मुलांना उपाशी मारण्याची योजना आखणारच हे पुरते ठाऊक असलेल्यांनी प्रत्येक पातळीवर लहान-मोठी मदत केली. ज्या मुस्लिम द्वेषाच्या पायावर हे सरकार आले होते. त्याच मुस्लिमांनी या बहुसंख्य हिंदू असलेल्या मुलांची पोटच्या पोरांप्रमाणे काळजी घेतली. त्यांचा संपर्क तोडण्यासाठी जॅमर लावले. तंत्रज्ञानात हुशार आणि विज्ञाननिष्ठ असलेल्या या मुलांनी चक्क जागोजागी हॉटस्पॉट उभे केले. दिल्लीतही भाजपाचे सरकार असल्यामुळे इथे साफसफाई ठेवण्यात आली नाही. तीही जबाबदारी या मुलांनी घेतली. त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही आंदोलनात न झालेली गोष्ट या मुलांनी केली. ती म्हणजे, आंदोलन बदनाम करण्याचा भाजपाचा नेहमीचा फंडा इथेही वापरला जाणार म्हणून त्यांनी या त्यांच्या शब्दातल्या मोदी मीडियाला आंदोलनामधून अक्षरशः हाकलून दिले. त्यातही मुलींनी पुढाकार घेतला. जर तिथे मुले असती तर मुंबईतील मराठा आंदोलनाप्रमाणे कोणाकरवी तरी विनयभंगाची तक्रार करून ते आंदोलन बदनाम करायला सज्जच होते. त्यांना इथे येऊ दिले नाही. काही तरुण यूट्यूबर्सनी या सार्‍या आंदोलनाच्या प्रचाराची जबाबदारी घेतली. सरकार या कंपन्यांना हाताशी धरून आंदोलन पुढे येऊ देणार नाहीत. त्यामुळे यांनी विविध तांत्रिक मार्ग अवलंबले. समाजमाध्यमावरच्या या प्रसिद्धीमुळे हे आंदोलन जगभर पोहोचले.
त्यानंतर भाजपाच्या सरकारने 20 जुलै रोजी आपले ब्रह्मास्त्र काढले. ते म्हणजे मारझोड करण्याचे, त्यासाठी रातोरात दिल्लीचे पोलीस अधिकारी बदलण्यात आले. त्यांना अधिकार देण्यात आले. त्यांनी सर्वांत आधी सोनम वांगचुक यांना उचलले. पोलिसांच्या मदतीसाठी कुठून कुठून गुंड आणले. या मुलांना मारण्यासाठी खास खिळे लावलेल्या काठ्या आणण्यात आल्या. मुलांना जीव जाईपर्यंत मारण्याचे आदेशही आले असावेत. कारण ज्या त्वेषाने हे पोलीस मुलांच्या अंगावर धाऊन गेले, त्यांना मारले. ते आतापर्यंत कधीच झाले नव्हते. मुलींना पुरुष पोलिसांनी व काही गुंडांनी अत्यंत खालच्या व भाजपाच्या खर्‍या पातळीवर जाऊन वाईट पद्धतीने हाताळले. त्यांचा विनयभंग केला. मुले त्यासाठीही तयार होती. त्यांनी सरकारच्या प्रत्येक संशयास्पद हालचालींचे असंख्य व्हिडिओ बनवले. ते जगभर गेले. कोट्यवधी रुपये खर्च करून काही लोकांना हाताशी धरून देशात जी विश्वगुरू अशी स्वतःच तयार केलेली उपाधी होती, ती एका क्षणात मातीत मिसळली. जगातील माध्यमांनी भारताचे सध्याचे सरकार ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अन्याय आणि अत्याचार करत आहेत, त्याची आपापल्या पद्धतीने निर्भत्सना केली. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारांवर पोसलेल्या या तरुण पिढीने गोडसेच्या विचारांच्या लोकांना सार्‍या जगात नागडे केले. मुलांनी आपल्याला अमानुषपणे मारल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. त्यांना सांगितले की आता घरी जा आणि आपल्या आमच्याच वयाच्या मुलांना सांगा की आम्ही आज लहान मुलांवर अमानुषपणे लाठ्या चालवल्या. त्यानंतर हे आंदोलन पेटले. एकेकाळी इंदिरा गांधी यांना देशातील जनतेने सत्तेतून पायउतार केले होते. मात्र, एक नेत्या म्हणून सर्वसामान्य जनतेत त्यांचा आदर कायम होता. यावेळी मात्र मुलांनी देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांवर जबरदस्त टीका केली. या मुलांनी आपली सारी सर्जनशीलता दाखवत विविध पोस्टर या आंदोलनात झळकावले. टी-शर्टवर संदेश लिहिले. समाजमाध्यमावर लोकांनी अगदी अभद्र भाषेत टीका केली. या सार्‍या आंदोलनातून यालोकांचा धार्मिक चेहराही समोर आला. मुलांना मारण्यासाठी अश्रुधूरांच्य नळकांड्या फोडल्या. त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी मुले जवळच्या एका मंदिरात पोहोचली. मंदिराचे दरवाजे आतून बंद करण्यात आले. त्याचवेळी जवळच्या मशीदींनी आणि गुरुद्वारामध्ये या लेकरांना आश्रय देण्यात आला. राममंदिरातील चोरीमुळे आधीच याचा धर्माविषयीचा खरा चेहरा उघड झालेला असताना या लहानसहान गोष्टींचेही मोठे पडसाद उमटले. त्या दिवशी पोलीस जणू वीस पंचवीस मुलांना ठार करण्याचे आदेश घेऊन आल्याप्रमाणे वागत होते. ते प्रकरण काहींनी सर्वोच्च न्यायालयात नेण्याचे प्रयत्न केले मात्र सरन्यायाधीशांनी आम्हाला हे व्हिडियो पाहण्या एवढा वेळ नसल्याचे सांगितले. मुलांनी तेही मनावर घेतले नाही. असे सारे काही होईल हे मुलांनी आधीच गृहित धरल्या प्रमाणे ही मुले वागली. हे आंदोलन हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याचे चित्र दिसून आले. हे आंदोलन केवळ जंतरमंतरवरच झाले नाही. तर देशाच्या अनेक भागात झाले. ज्या ठिकाणी आपले लोकशाहीचा एक स्तंभ नुकताच जाऊन आला होता त्या लंडनमध्येही आंदोलन झाले. जर्मनीमधल्या बर्लिनमध्ये आंदोलन झाले. कल्पना चावला सह जगभरातल्या अनेक मोठ मोठ्या लोकांनी या आंदोलनाला समर्थन दिले. देशातीलही संवेदनशील कलाकारांनी आपला धंदा न पाहाता थेट पुढे येऊन आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यात आपला चित्रपट सोनम वांगचूक यांच्यावर आधारित नाही असे म्हणत एका तीन तीन लग्न केलेल्या कलाकारांनी हिंदूंचा ठेका घेतलेल्या लोकांकडून क्लिनचीट पदरात पाडून घेतली. ज्याला देशात महानायक म्हटले जात होते तो एक धंदेवाईक कलाकार असून तो महत्त्वाच्या वेळेस नेहमी गप्प बसतो हेही अधोरेखित झाले. या मुलांनी सर्व तथाकथित नियम मोडून टाकले. सनातन धर्माचे नाव घेत एका गुंडाने एक धमकी देणारा व्हिडीयो टाकला त्याला मुलांनी हिंग लाऊनही विचारले नाही. जेव्हा जंतरमंतरवर हजारो विद्यार्थी होते तेव्हा काही वाहिन्यांनी तिथे सात आठ मुले असल्याचे सांगितले. या मुलांना आंदोलनस्थळी जाऊ दिले नाही. बिहारमधून आणि देशाच्या विविध भागातून येणार्‍या रेल्वेगाड्यांना विलंब करण्यात आला. जागोजागी आपले गुंड पेरले. आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनात जाऊन काही काही बडबडले. मुलांनी अशा लोकांवर बारकाईने लक्ष दिले त्यांना हाकलून दिले. या मुलांना आता धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा हवा आहे. की या सरकारचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनाने मुलांचा किती फायदा हे होऊ देतील हे माहित नाही. मात्र काही संघटनांचे आर्थिक नुकसान झाले. ज्याच्या प्रतिमेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले त्यांचे जनमानसामधील नेमके स्थान काय हे एका बाजूला दिसून आले तर राहुल गांधींची प्रतिमा खराब करण्यासाठी जे कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले तेही पाण्यात गेले. मुलांनी लक्ष ठेवल्यामुळे काही तरी मोठा अपघात करुन किंवा जिवीतहानी करुन हे आंदोलन दडपण्याची नेहमीची खेळीही यशस्वी झाली नाही. आमच्या पिढीला वाटायचे की या मुलांनी गांधी वाचले नाहीत. आंबेडकर वाचले नाहीत. नेहरुंच्या विचारांपासून दूर राहण्यासाठी यांच्या समोर त्यांची सातत्याने बदनामी केल गेली. यांना जीवनातील चांगल्या गोष्टी कळणार आहेत की नाही. या मुलांनी दाखवून दिले की त्यांनी गांधी केवळ वाचले नाहीत तर कोळून प्यायले आहेत. हा देश गांधीचाच राहणार. या सार्‍यांचे नेतृत्व करणार्‍या अभिजीत टिपकेचेही कौतुक करायला हवे. त्याने अत्यंत संयमाने कुठेही विचारांपासून प्रतारण न करता हे आंदोलन चालवले. एका साध्या टीशर्ट वर वावरणारा हा मुलगा दहा लाखांच्या सुटवर भारी पडला.

‘Mantar’ of Jantar-Mantar

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *