देवळा-मालेगाव रस्त्यावर अपघातात दोघे जागीच ठार

नाशिक : प्रतिनिधी
देवळा-मालेगाव रस्त्यावर वनक्षेत्र परिसरातील पिंपळगाव वळणावर शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी पाचच्या सुमारास इर्टिगा कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्यासह अन्य सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ठार झालेल्या दोघांना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. देवीदास पांडुरंग ठाकरे (26) व कैलास पुंडलिक देवरे (55) अशी मृतांची नावे आहेत.
देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास देवळा- मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव (वा.)च्या वळणाजवळ देवीदास ठाकरे, कैलास देवरे (दोन्ही रा. धोबीघाट, दहिवड, ता. देवळा) हे मोटारसायकलने (एमएच 41, बीएस 3152) दहिवडकडून देवळ्याकडे येत असताना मारुती इर्टिगा कार (एमएच 04, एचयू 1283) देवळ्याकडून दहिवडकडे जात असताना या दोन्ही वाहनांमध्ये हा अपघात झाला. मोटारसायकलस्वार दोघे जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, मारुती इर्टिगा कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते तपास करीत आहेत.

 

Two killed on the spot in an accident on the Deola-Malegaon road.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *