खेडभैरव परिसरात वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद

6 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त; सहा संशयितांना अटक

घोटी : प्रतिनिधी
शेतकर्‍यांच्या विहिरी व नदीपात्रातून वीजपंप चोरी करणार्‍या टोळीचा घोटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून नऊ वीजपंप आणि गुन्ह्यात वापरलेली हुंडाई औरा कार असा एकूण 6 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
10 ऑगस्टला खेडभैरव (ता. इगतपुरी) येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाजे यांच्यासह अन्य दोन शेतकर्‍यांच्या नदीपात्रातील तीन मोटारी चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हवालदार संतोष नागरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत वैभव डहाळे, परमेश्वर बेंड कोळी, महेश डगळे, विनायक साबळे, महादू लोते आणि राहुल वारुंगसे या सहा संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्यांनी इतर ठिकाणांहूनही वीजपंप चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संतोष नागरे, दीपक सांगळे, भाऊसाहेब बिन्नर, सुनील पाटील, योगेश यंदे व प्रकाश यांच्या पथकाने केली.

Gang stealing electric pumps in Khedbhairav ​​area nabbed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *