मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांवर पोलिसांची कारवाई; 38 जणांवर गुन्हे

सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध पातळ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. गटारी अमावास्येच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणार्‍या वाहनधारकांविरोधात अंबड पोलिसांनी विशेष मोहीम राबविली असून, आतापर्यंत 38 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
गटारी अमावास्येच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने रस्त्यांवरील वाहतूक वाढते. अशा वेळी मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अंबड पोलिसांनी हद्दीतील विविध ठिकाणी तपासणी नाके उभारून वाहनचालकांची तपासणी सुरू केली आहे. तपासणीदरम्यान मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांविरोधात नियमानुसार कारवाई केली जात आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अवैध धंद्यांवरही पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात असून, सण-उत्सवांच्या काळात नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांमध्ये धाक निर्माण झाला असून, नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अंबड पोलिसांच्या कारवाईतून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी दिला आहे.

Police action against drunk drivers; cases registered against 38 individuals.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *