नाशिक : प्रतिनिधी
डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी मनपाने पावसाळ्यापूर्वीच तपासणी मोहीम सुरू केली होती. जानेवारी ते ऑगस्ट 2026 या कालावधीत 2,065 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी 89 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील 33 रुग्ण केवळ ऑगस्ट महिन्यातील आहेत. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूचा फैलाव झाला असून, 54 जणांना त्याची लागण झाली आहे.
मागील वर्षी ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे 124 रुग्ण आढळले होते. डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने इंदिरानगर येथील एका शाळेला पाच हजार रुपये, तर सिडकोतील एका नागरिकाला 200 रुपये दंड करण्यात आला. त्यामुळे एकूण पाच हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ताप, अंगदुखी, घसादुखी, सर्दी, पोटदुखी आणि मळमळ यांसारखी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल होत आहेत. मनपा प्रशासनाच्या तपासणीत ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 33 रुग्ण आढळले असून शहरी भागात स्वाइन फ्लूूचे 54 रुग्ण आढळून आले आहेत.
जानेवारी ते जुलैपर्यंत केवळ 12 रुग्ण आढळले असून, ऑगस्टमध्ये एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. शहरात मलेरियाचा प्रादुर्भाव सध्या नगण्य आहे.
54 cases of swine flu and 33 cases of dengue in the city.