दि. 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती अडचणीची राहील. धनचिंता सतावतील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होईल. आरोग्य जपा.
वृषभ : सामान्य सप्ताह
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांसाठी हा सप्ताह अतिशय सामान्य राहील. परिश्रमाचे योग्य मूल्य मिळणार नाही. कुठल्याही मोहात पडू नका. आरोग्य सांभाळा.
मिथुन : प्रगतीकडे वाटचाल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू या ग्रहाच्या कृपादृष्टीमुळे वाटचाल प्रगतीकडे होईल. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांवर कामाचा बोजा राहील. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील. मनावर संयम ठेवा. प्रकृती सांभाळा.
कर्क : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी वादविवाद टाळावे. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये. मानसिक अस्वथता राहील. प्रकृती जपा.
सिंह : सामंजस्य दाखवा
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे अडचणीत येतील. कौटुंबिक वादविवाद सामंजस्याने सोडवा. नोकरदारांची इच्छा पूर्ण होईल. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी जाणवतील. प्रकृती सांभाळा.
कन्या : आर्थिक दिलासा
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील. नोकरदारांनी मनावर संयम ठेवून काम करण्याची आवशक्यता राहील. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. आर्थिक दिलासा मिळेल.
तूळ : पैसे वसूल होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनि प्रतिकूल आहेत. या सप्ताहात चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. आर्थिक परिस्थिती टंचाईची राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांचे मन अस्वस्थ करणार्या घटना घडतील. व्यापारी, व्यावसायिकांचेे अडकलेले पैसे वसूल होतील. प्रकृती चांगली राहील.
वृश्चिक : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू, शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीमुळे खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळणार नाहीत. सुखवार्ता कळतील.
धनु : पदोन्नती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, राहू, केतू, शुक्र अनुकूल आहेत. गुरू, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांची पदोन्नती होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. शेअरमध्ये सावधपरे गुंतवणूक करा. आरोग्यप्रश्नांबाबत सतर्क राहा.
मकर : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते चुकतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. प्रकृतीची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
कुंभ : मंगलकार्य होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांकडे मंगलकार्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. आरोग्य जपा.
मीन : अडचणी दूर होतील
या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहे. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, शुक, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, आरोग्या काळजी घ्या.
Weekly Horoscope