‘मिशन ग्रीन मान्सून’चा दहावा टप्पा
नाशिक : प्रतिनिधी
‘उन्नत नाशिक अभियानांतर्गत कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ मोहिमेचा दहावा टप्पा गंगापूर धरण परिसरातील चैतन्य फार्मसमोर उत्साहात पार पडला. यावेळी पाच हजार देशी रोपांच्या लागवडीस प्रारंभ करण्यात आला.
या टप्प्यासह मोहिमेंंतर्गत आतापपंर्यंत 44 हजार 500 देशी रोपांंची प्रत्यक्ष लागवड, तर दहा हजार 775 रोपांचे वाटप करण्यात आले आहे. एकूण 55 हजार 275 रोपांंचा टप्पा पूर्ण झाला आहे.
जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील धरणे व कालवा परिसरात 25 हजारांहून अधिक देशी रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची सुरुवात गंगापूर धरण परिसरातून झाली. वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या संगोपन व संवर्धनावरही भर दिला जाणार आहे.
यावेळी महापौर हिमगौरी आडके, तालुका पोलीस निरीक्षक सुनंदा नाईक, गोवर्धनचे सरपंच लखन बेंडकुळे, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, चंदू पाटील, सुनील मेढेकर तसेच जलसंपदा विभागाचे राजेश जी. गोवर्धने, सोनल शहाणे, मिलिंद काळे, ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, युवक व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.
‘एक झाड- एक जबाबदारी’चा संदेश देत वृक्षलागवड, संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि नाशिकचे हरित आच्छादन वाढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Planting of 5,000 native saplings in the Gangapur Dam area.