नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत आठवीमध्ये शिकणार्या तेरावर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लावण्या लहुदास भोवंडे (वय 13, रा. काथवडपाडा, ता. त्र्यंबकेश्वर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत अनिवासी (डे स्कॉलर) विद्यार्थिनी म्हणून शिक्षण घेत होती. गुरुवारी (दि. 3) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी परतल्यानंतर तिने राहत्या घरात छताच्या वाशाला गणवेशाच्या ओढणीने गळफास घेतला. ही माहिती मिळताच हरसूल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
Boripada Ashram School student commits suicide at home.