चेतनानगरमध्ये महिला दहीहंडी उत्साहात

सिडको : प्रतिनिधी
चेतनानगर येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि सह्याद्री युवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. श्रीकृष्णाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. महिलांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला. शारदा शाळेतील मुलींनी तीन थरांचा मानवी मनोरा रचून पहिली दहीहंडी फोडली. त्यानंतर सह्याद्री युवक मंडळाच्या गोविंदांनी दुसरी दहीहंडी फोडत जल्लोष केला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड, ज्योती गायकवाड आणि निखिल अलई यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी अप्पा बाविस्कर, रमेश जगताप, अरविंद अत्तरदे, नारायण धामणे, बाळासाहेब काळे, मनोज चव्हाण, विष्णू उगले, घनश्याम कुलकर्णी, विजय काटवे, अजय पाटील, नीलेश वर्पे आणि शैलेश कारले यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

 

Women’s Dahi Handi celebrated with enthusiasm in Chetananagar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *