मध्यरात्री पिंजर्यात अडकला 5 ते 6 वर्षांचा नर बिबट्या
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरातील उपनगरात बिबट्या पकडल्याच्या दुसर्याच दिवशी ढोकी फाटा परिसरात आणखी एक नर बिबट्या पिंजर्यात अडकला. सोमवारी (दि. 5) मध्यरात्री 12 वाजता सोपान शिंदे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजर्यात हा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ढोकी फाटा परिसरातील शिंदे मळ्यात बिबट्याचा वावर असल्याची माहिती शनिवारी (दि. 3) वन विभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी तानाजी भुजबळ, वन्यजीव बचाव पथकातील निखिल वैद्य व रोहित लोणारे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर शनिवारी सकाळीच शिंदे मळ्यात पिंजरा लावण्यात आला. वन विभागाचे पथक बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर सोमवारी मध्यरात्री बिबट्या पिंजर्यात अडकला. पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. पाच ते सहा वर्षांचा हा नर बिबट्या असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी मोहदरी वन उद्यानात हलविण्यात आले आहे.
Two leopards captured in Sinnar within 24 hours.