वाढता वाढता वाढे डेंग्यू रुग्णांची संख्या

तीन आठवड्यांत संख्या 109 वर

नाशिक : प्रतिनिधी
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असून, ऑक्टोंबरच्या तीन आठवड्यांतच डेंग्यू रुग्णाची संख्या 109 वर गेली आहे. त्यामुळे शहरात अजूनही डेंग्यूचा उद्रेक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून डेंग्यूचे हॉटस्पॉट नष्ट करूनही त्यावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे.
महापालिकेने शहरातील शासकीय कार्यालय, इमारती डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहे. मनपा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत आरोग्य विभागाने त्यांना साफसफाई करा व हॉटस्पॉट नष्ट करा, अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही कार्यवाही न केल्यास दंड आकारला जाईल, अशा इशारा दिला आहे. बांधकाम साहित्य व इतर अडगळीच्या वस्तूमध्ये पाणी साचून डेंग्यू डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण आहे. ते पाहता आरोग्य विभागाने सहाही विभागांत ज्या बांधकाम साइट सुरू आहेत. त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम साइट्स रडारवर-शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पाया खोदण्यात आला आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे चित्र आहे. एसटी वर्कशॉप येथे अडगळीत पडलेले टायर, ट्यूब व इतर भंगार साहित्य होते. त्यात पाणी साचले व डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना नोटिसा बजावल्या. साफसफाई करून औषध फवारणी करून घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात 1,670 रुग्ण संशयित सापडले.

स्वाइन फ्लू ओसरला
दरम्यान, डेंग्यू रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र स्वाइन फ्लू नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. डेंग्यू अद्याप पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे.

The number of dengue patients continues to rise.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *