शहा येथे मध्यरात्री चोरी; 73 हजारांचा मुद्देमाल लंपास
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील शहा येथे मध्यरात्री पांढर्या रंगाच्या बलेनो कारमधून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी शेळी, मेंढ्या आणि कोकरे असा एकूण 73 हजार रुपये किमतीचा सात जनावरांचा कळप चोरून नेला. 24 ऑक्टोबर रोजी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
शहा येथील मेंढीपालन व्यावसायिक योगेश नानाभाऊ कांदळकर (वय 35) आणि त्यांचे चुलते भाऊसाहेब भवानी कांदळकर यांच्या मालकीची जनावरे चोरट्यांनी चोरून नेली. यामध्ये योगेश कांदळकर यांची 15 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची एक शेळी आणि प्रत्येकी 15 हजार रुपये किमतीच्या दोन पांढर्या मेंढ्यांचा समावेश आहे. तसेच भाऊसाहेब कांदळकर यांची प्रत्येकी सात हजार रुपये किमतीची चार पांढरी कोकरेही चोरट्यांनी लंपास केली.
एकूण सात जनावरांची किंमत 73 हजार रुपये असून, चोरट्यांनी ही जनावरे बलेनो कारमधून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. योगेश कांदळकर यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात कारचालकासह अन्य चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
Balenos came from the car and spread out with goats and sheep