नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिकमध्ये सध्या कामांची लगीनघाई सुरू आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे खोदकाम नागरिकांच्या जिवावर उठले आहे. शुक्रवारी आणखी एक वकील महिलेचा रस्ते अपघातात बळी गेला. उड्डाणपुलावरून जाणार्या कंटेनरने या तरुण महिलेचा बळी घेतला.
कुंभमेळ्यामुळे रस्त्यांचे सुरू झालेले काम, एमएनजीएल रस्त्यांचे खोदकाम आणि नाशिककरांचा ट्रॅफिक मोडण्याचा आता झालेला सुळसुळाट याने एकंदरीतच या वर्षात अनेक अपघात घडत आहेत आणि नुसते घडत नाहीत, तर त्यात अनेक जणांचा मृत्यू होत आहे. कारणे खूप आहेत. सर्व नियमावली आपल्या हितासाठी असूनदेखील ती आपल्याला जाच वाटते, हेपण खरे आहे. हिरोगिरीच्या नादात तर कधी घाईत का असेना आपण ट्रॅफिकचे नियम मोडत आहोत. बाइकवाले त्याची लेन सोडून, मधल्या लेनवर येतात अणि अजून पुढे काही आले तर अजून पुढील लेन म्हणजे डिव्हायडरच्या लेनकडे जातात. वास्तविक त्याची डावी लेन असते तिकडूनच त्यांनी चालले पाहिजे अणि ओव्हरटेक करताना आधी आरशात बघितले पाहिजे. मागे कोणते गाडी नाही ना, मग ओव्हरटेक केले पाहिजे. आपण मेन रोड/हायवेला लागणार असू, तर आपले काम असते कोणते गाडी तर नाही ना येत? कारण मेन रोड, हायवेवरचे वाहने जोरात राहणारच. आपण मेनरोडला जात आहोत तर बघून घेतले पाहिजे, पण बाइकवाले अणि इतरही लोक डायरेक्ट मध्ये गाडी घुसवतात. नियम मोडणार्यांमध्ये जागृती करण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. पण शंंभर घेऊन आपल्याला मूर्ख ठेवतात अणि आपणपण चारशे वाचले म्हणून खूश होतो.
रिक्षावाल्यांचा विषय तर फार गंभीर आहे. गावाकडून तडीपार अणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 70 टक्के लोक आहेत आणि बाइक चालवणार्यांनाही वाहतूक नियम माहीत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणले होते की, अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा धडा टाकणार आहोत. पण आज सात वर्षे झाली, पण काहीच अंमलबजावणी झालेेली नाही. आपण हुशार झाले पाहिजे. आपली रस्त्यावरील लेन कोणती, नियम काय ते माहीत करून घ्या. आपल्या घरातील महिला अणि मुलांना सांगा, आपणपण माहिती घ्या. सुरक्षित राहा. सुखरूप जगा अणि जगू द्या, असे म्हटले गेले आहे.
जिंदगी एक सफर है, सुहाना यहा कल क्या होगा किसने जाना?
Kal kya hoga kisne jaana?