आकाशकंदिलांनी बाजारपेठ उजळली

हस्तनिर्मित, खणाच्या कापडाच्या कंदिलांना पसंती

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीसाठी नाशिकच्या बाजारपेठा रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी सजल्या आहेत. पारंपरिक बांबू आणि कागदाच्या कंदिलांसोबतच यंदा खणाचे कापड, ज्यूट, वेल्वेट आणि आकर्षक नक्षीकाम केलेल्या कंदिलांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारे विविध आकार आणि रंगसंगतीतील कंदील बाजारात दाखल झाले असून, खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.
षटकोनी, चौकोनी, डायमंड, स्टार, मॅजिक स्टार अशा विविध आकारांतील कंदील लक्ष वेधून घेत आहेत. वारली चित्रशैली, मोर, फुलांची नक्षी आणि आकर्षक कलाकुसर असलेल्या कंदिलांना विशेष मागणी आहे. पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या हस्तनिर्मित कंदिलांकडेही ग्राहकांचा कल वाढला आहे. यंदा केवळ रोषणाईपेक्षा घराच्या सजावटीला उठाव देणार्‍या कंदिलांची निवड केली जात आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम कंदिलांच्या किमतीवर झाला असला तरी ग्राहकांचा उत्साह कायम आहे.

कंदिलांचे दर
♥ साधे कागदी कंदील : 50 ते 150 रुपये
♥ आकर्षक नक्षीकामाचे : 150 ते 400 रुपये
♥ कापडी व खणाचे : 300 ते 800 रुपये
♥ मोठे सजावटीचे कंदील : 800 ते 2,500 रुपये
♥ विशेष कलाकुसरीचे कंदील : 5,000 रुपयांपर्यंत

यंदाचे आकर्षण आणि नवे कल
खणाच्या कापडापासून तयार केलेले कंदील
वारली चित्रशैली आणि पारंपरिक नक्षीकाम
ज्यूट, बांबू आणि पर्यावरणपूरक साहित्य
विद्युत रोषणाई असलेले आधुनिक कंदील
मोठ्या आकाराच्या कंदिलांना पसंती

यंदा पारंपरिक कंदिलांसोबतच खणाचे कापड आणि हस्तनिर्मित कंदिलांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. आकर्षक रंगसंगती आणि वेगळ्या कलाकुसरीच्या कंदिलांची मागणी वाढली आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. – संतोष देवरे, व्यावसायिक

The marketplace lit up with sky lanterns.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *