वडनेर दुमालात 258 किलो मोतीचूर लाडू जप्त

निकृष्ट दर्जाचा संशय, ‘एफडीए’कडून नोंदणी प्रमाणपत्र निलंबित

सिडको : प्रतिनिधी
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत वडनेर दुमाला येथील मे. श्री बालाजी लाडू या आस्थापनेवर कारवाई करण्यात आली. अस्वच्छ वातावरणात लाडूंची निर्मिती आणि साठवणूक होत असल्याचे आढळल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले. तसेच सुमारे 64 हजार 500 रुपये किमतीचे 258 किलो मोतीचूर लाडू जप्त केले.
तपासणीदरम्यान प्रशासनाने 258 किलो मोतीचूर लाडूंचा साठा जप्त केला. अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि आस्थापनेतील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्याची कारवाई
करण्यात आली.
अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी वैभव गर्दै आणि श्रद्धा राहिज यांनी ही कारवाई केली.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

258 kg of Motichoor ladoos seized in Vadner Dumala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *