धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार
सिडको : प्रतिनिधी
पंचवटी परिसरात किरकोळ वादातून भाजी विक्रेत्याला तिघांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी एका संशयिताने धारदार शस्त्राने डोक्यावर वार केल्याने भाजीविक्रेता जखमी झाला. याप्रकरणी फिर्यादी संतोष निवृत्ती रणमाळे (वय 30, रा. प्लॉट क्रमांक 29, लक्ष्मण निवास, जैन स्टेशनशेजारी, दत्तनगर, पंचवटी) यांनी याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष रणमाळे पंचवटी कारंजा येथील भगवती मिसळसमोर रोडवर उभे असताना संशयित कुणाल जाधव आणि त्याच्या दोन साथीदारांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर दत्तनगर येथील रामशेज स्वीट्सजवळ पुन्हा त्यांच्यात वाद झाला.
यावेळी तिघांनी रणमाळे यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. त्यात कुणाल जाधव याने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केला.
या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांच्या डोक्यावर सहा टाके घालण्यात आले आहेत.
याप्रकरणी कुणाल जाधव आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Three people assaulted a vegetable vendor with wooden sticks.