कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते

सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

सिडको : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत खाते असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करणारे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी अज्ञात खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहर सायबर पोलिसांचे पथक सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असताना इन्स्टाग्रामवर खाते आढळले. या खात्यावरून सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि पोस्ट प्रसारित केले जात होते.
या खात्याची पाहणी केली असता, ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक या शासकीय कार्यालयाचे अधिकृत खाते असल्याचा भास निर्माण करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी संबंधित खातेधारकाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा तसेच शासकीय योजना आणि कार्यक्रमांची माहिती घेताना नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांचा आणि प्रमाणित समाजमाध्यम खात्यांचाच वापर करावा. बनावट किंवा संशयास्पद खाते आढळल्यास नाशिक शहर सायबर पोलीस ठाणे किंवा पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 9923323311 अथवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Fake Instagram account created in the name of the Kumbh Mela Authority

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *