दि. 15 ते 21 नोव्हेंबर 2026
मेष : विश्वास वाढेल
या सप्ताहात परस्पर समजूतदारपणा वाढेल. तसेच नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल. गेल्या काही काळापासून एखाद्या गोष्टीवरून मतभेद सुरू असतील, तर संवादाच्या माध्यमातून ते दूर करण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात भावनांपेक्षा स्वतःची समज आणि अनुभव यांवर विश्वास ठेवून निर्णय घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
वृषभ : आनंददायी वार्ता कळतील
या आठवड्यात आनंददायी परिस्थिती निर्माण होईल. एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न होऊ शकते. तुम्ही नवीन नात्याची सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर परिस्थिती तुमच्या बाजूने अनुकूल राहू शकते. आठवड्याच्या शेवटी प्रिय व्यक्तीसोबत फिरायला जाण्याची किंवा एकत्र चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मिथुन : सौख्य लाभेल
हा आठवडा प्रेमसंबंधांच्या बाबतीत संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. बाहेरून सर्व काही सामान्य आणि आनंदी दिसत असले, तरी मनात एखाद्या जुन्या गोष्टीमुळे किंवा न बोललेल्या चिंतेमुळे अस्वस्थता राहू शकते. अशा वेळी जोडीदारापासून आपल्या भावना लपवण्याऐवजी मोकळेपणाने संवाद साधणे योग्य ठरेल.
कर्क : समाधान लाभेल
आठवड्याची सुरुवात प्रेमसंबंधांच्या बाबतीत थोडी भावनिक आव्हाने घेऊन येऊ शकते. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून मनात संशय किंवा विनाकारण चिंता निर्माण होऊ शकते. जोडीदाराच्या एखाद्या प्रतिक्रियेला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देणे टाळा. मात्र, ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होत जाईल.
सिंह : सुखवार्ता कळतील
या आठवड्याच्या सुरुवातीलाच एखादी चांगली बातमी तुमच्या चेहर्यावर हास्य आणू शकते. जोडीदारासोबतचे नाते अधिक चांगले होईल. तसेच एकमेकांबद्दलचे आकर्षण आणि विश्वास वाढेल. जे लोक आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठीही अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कन्या : अस्वस्थ जाणवेल
या आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या गोष्टीमुळे मनातील अस्वस्थता वाढू शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाराजी किंवा राग व्यक्त केल्यास नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. रागाच्या भरात बोललेले कठोर शब्द जोडीदाराच्या मनाला दुखावू शकतात आणि नंतर तुम्हालाही पश्चात्ताप होऊ शकतो. उत्तरार्धातही मनातील अस्वस्थता कायम राहण्याची शक्यता.
तूळ : संधी चालून येतील
या आठवड्यात नव्या सुरुवातीच्या शुभ संधी निर्माण होऊ शकतात. एखाद्या नात्यात दीर्घकाळापासून स्थिरता किंवा एकसुरीपणा जाणवत असेल, तर आता परिस्थिती बदलताना दिसेल. परस्पर संवाद आणि समजूतदारपणामुळे नात्यात नवी ऊर्जा निर्माण होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते.
वृश्चिक : समजूतदारपणाने वागा
हा आठवडा एखाद्या जुन्या गोष्टीमुळे किंवा परस्पर मतभेदांमुळे जोडीदारासोबत मतभिन्नता निर्माण होऊ शकते. मात्र, तुमची समजूतदार वृत्ती आणि शांत स्वभाव अनेक समस्या सोडवण्यास मदत करेल. नात्यात विनाकारण हट्ट धरणे टाळा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा होऊ शकते.
धनु : सकारात्मक बदल घडतील
या आठवड्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परस्पर समजूतदारपणा वाढेल आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक किंवा वैयक्तिक विषयामुळे मन थोडे अस्वस्थ राहू शकते. या काळात आपल्या चिंतेचा परिणाम प्रेमसंबंधांवर होऊ देऊ नका. संयम आणि संवादातून नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यात यश मिळेल.
मकर : संधी मिळेल
या आठवड्यात नात्यात अधिक आपलेपणा जाणवेल. उत्तरार्धात भावना आणि विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळेल. इतरांसमोर आपले मत मांडताना संकोच करू नका. मात्र, संवाद साधताना जोडीदाराच्या भावनांचाही विचार करा. आठवड्याचा शेवट आनंददायी परिस्थिती घेऊन येईल आणि नात्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास वाटेल.
कुंभ : सौहार्द वाढेल
तुम्हाला जोडीदारासोबत अधिक वेळ घालवायला आवडेल. नात्यातील परस्पर विश्वास आणि सौहार्द वाढेल. जे लोक आपल्या प्रेमसंबंधाला कुटुंबाची मान्यता मिळवून देऊ इच्छितात, त्यांच्यासाठीही या आठवड्यात चर्चा पुढे नेण्याची चांगली संधी आहे. मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. छोट्या गोष्टींचे मोठे रूपांतर करू नका.
मीन : आनंद लाभेल
परस्परप्रेम आणि सामंजस्य अधिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. स्वतःचे म्हणणे पटवून देण्याचा हट्ट करण्याऐवजी एकमेकांच्या मतांचा आदर करा. आठवड्याच्या उत्तरार्धात नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. जोडीदारासोबत संयम आणि समजूतदारपणाने पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
Weekly Horoscope