दोन मित्रांचा प्रवास ठरला अखेरचा! छोटा हत्तीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी
पांढुर्ली-विंचूर दळवी शिवरस्त्यावर भरधाव छोटा हत्ती मालवाहू टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आकाश पवार आणि शुभम भोईर या 21 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. तर प्रसाद वाघ गंभीर जखमी झाला. या घटनेने विंचूर दळवी परिसरात हळहळ व्यक्त
होत आहे. हा अपघात 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास विंचूर दळवी शिवारात घडला. मखमलाबाद (नाशिक) येथील जितेश धर्मा सोनकांबळे हा टाटा एस गोल्ड छोटा हत्ती (एमएच 15 जे डब्ल्यू 4170) घेऊन पांढुर्लीहून विंचूर दळवीच्या दिशेने जात होता. यावेळी भरधाव वेगात वाहन चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या टेम्पोची समोरून येणार्‍या हिरो स्प्लेंडर दुचाकीला (एमएच 15 जीयू 9272) जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले. आकाश भाऊसाहेब पवार (21) आणि शुभम शिवराम भोईर (21) यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर प्रसाद रुंजा वाघ (20, रा. विंचूर दळवी) हा गंभीर जखमी झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले.
याप्रकरणी जखमी प्रसाद वाघ यांच्या फिर्यादीवरून टेम्पोचालक जितेश सोनकांबळे याच्याविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A journey taken by two friends proves to be their last! Both die after being struck by a ‘Chhota Hathi’ (mini-truck).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *