ठक्कर बझारजवळ अनोळखी मृतदेह

नाशिक : प्रतिनिधी
ठक्कर बझार बसस्थानकाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वय अंदाजे 45, डोक्याचे केस काळे, दाढी वाढलेली, रंग गव्हाळ, मिशा जाड आणि वाढलेल्या, अंगात राखाडी रंगाचा हाफ बाहीचा शर्ट, मेहंदी रंगाची फुल नाईट पॅन्ट, त्यावर पांढरे दोन पट्टे. या अनोळखी व्यक्तीबद्दल कुणाला काही माहिती असल्यास सरकारवाडा पोलिस ठाण्यातील हवालदार के. डी. गांगोडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सरकारवाडा पोलिसांनी केले आहे.

Unidentified dead body near Thakkar Bazar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *