दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

साकोरा, वाखारी गावांवर शोककळा

 

 

नांदगाव : प्रतिनिधी
नांदगाव-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 18) रात्री दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नांदगाव तालुक्यातील साकोरा आणि वाखारी गावांवर शोककळा पसरली आहे.
साकोरा येथील गणेश जिभाऊ पवार (वय 42) हे आपल्या भावाला मुलगा झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मालेगावला जात होते. तर वाखारी येथील माजी सरपंच (कै.) अण्णासाहेब चव्हाण यांचा मुलगा गणेश चव्हाण (वय 39) हे नांदगावकडे येत होते. रात्री सुमारे पावणेदहाच्या सुमारास मविप्र महाविद्यालयापुढील वळणावर हॉटेल मल्हारवाडासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून दोघांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. साकोरा येथील गणेश पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. वाखारी येथील गणेश चव्हाण यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. दोघांच्या अकाली निधनामुळे दोन्ही गावांत हळहळ व्यक्त होत आहे.

Two killed in horrific two-wheeler accident

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *