गाडी बाजूला घेण्याच्या वादातून एकावर हल्ला

अंबड लिंकरोडवर चौघांनी केली मारहाण

सिडको : प्रतिनिधी
वाहन बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अशोक लेलँड गाडीवरील चालकासह चौघांनी एका व्यक्तीला मारहाण करून धारदार शस्त्राने गंभीर जखमी केल्याची घटना अंबड लिंकरोडवरील आझादनगर परिसरात घडली. यावेळी संशयितांनी फायटरने चेहर्‍यावर मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्लॉट क्रमांक 40, गट क्रमांक 24/ओ, आझादनगर, अंबड लिंकरोड येथे हा प्रकार घडला. अझरुद्दीन ऐसामोद्दीन शेख यांचा अशोक लेलँड गाडी(एमएच 15 केएस 5388)वरील चालक आणि त्याच्या तीन साथीदारांशी वाहन बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद झाला.
या वादातून चौघांनी संगनमत करून अझरुद्दीन यांना शिवीगाळ केली आणि वाहनातून खाली ओढले. त्यानंतर दोघांनी त्यांचे हात मागे पकडले, तर तिसर्‍या संशयिताने फायटरने त्यांच्या चेहर्‍यावर मारहाण केली. याचवेळी वाहनचालकाने हातातील धारदार शस्त्राने त्यांच्या नाकावर आणि कपाळावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी जखमीचा भाऊ शोएब ऐसामोद्दीन शेख (वय 39, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भांडे पुढील तपास करीत आहेत.

Assault following a dispute over moving a vehicle aside

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *