मनपाच्या अतिक्रमण, नगरचना, बांधकाम विभागांची कार्यवाही
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील द्वारका ते दत्त मंदिर चौकादरम्यान सहा पदरी रस्ता रुंदीकरणासह दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडचे काम केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवत रस्ता रुंदीकरणासाठीची आवश्यक 45 मीटरची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सोमवारी (दि.23) सकाळी द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान 130 ठिकाणांना सीमांकान (डिमार्केशन) करत कार्यवाही केली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या सहा किमी महामार्गाचे काम होत आहे. केंद्राच्या न्हाई ने 221.52 कोटींची मंजुरी दिली असता, निविदेत 84 कोटींनी कमी बोली लागल्याने 137 कोटींमध्ये या महामार्गाचे काम मार्गी लावले जाणार आहे. सिंहस्थात कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. एप्रिल 2027 पर्यर्ंत सहा किलोमीटर महामार्गाचे काम मार्गी लावण्याचे आव्हान आहे. रुंदीकरणाच्या कक्षेत येणार्या खाजगी जागामालकांना बांधकाम टीडीआर देण्यात येत आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका ते दत्त मंदिर- नाशिकरोड दरम्यान 6.4 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होतेे. वाहतुकीची ही कोंडी कायमची सुटावी, यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव न्हाईकडे सादर केला होता. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सदर रस्ता रुंदीकरणाबाबत न्हाई आणि महापालिका प्रशासनात अनेक बैठका पार पडल्या. त्यात 8 मे रोजी दिल्लीत वाहतूक व दळणवळण मंत्रालयात महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीला महापालिका आयुक्त खत्री उपस्थित होत्या. त्यानंतर मंत्री गडकरी यांनी द्वारका सर्कल- उपनगर नाका- दत्त मंदिर चौक या मार्गाचे सहा पदरीकरण करण्यासाठी आणि दोन्ही बाजूंना दोन पदरी सेवा रस्त्यांचे (सव्हिर्र्स रोड) बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर केला. सध्या पक्के बांधकाम वगळता या महामार्गाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Demarcation at 130 locations for the widening of Dwarka Road