बडदेनगरमध्ये गवताच्या गंजीला आग

मोठे नुकसान, अग्निशामककडून आग आटोक्यात

सिडको : प्रतिनिधी
जुने सिडको परिसरातील बडदेनगर येथे रविवारी (दि. 22) रात्री मोकळ्या जागेत ठेवलेल्या गवताच्या गंजीला अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. आगीत गवताची गंजी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, ही आग लागली की लावली गेली याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बडदेनगर येथे दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी तातडीने आग विझविण्याची मोहीम हाती घेतली. गवताने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत होत्या. त्यामुळे आग परिसरातील अन्य वस्तूंपर्यंत पोहोचू नये, यासाठी जवानांनी विशेष खबरदारी घेतली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले.
या घटनेत गवताची गंजी जळून पूर्णपणे खाक झाली. सुदैवाने आग लागली त्यावेळी परिसरात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग अन्यत्र पसरण्यापासून रोखण्यात आली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. दरम्यान, गवताच्या गंजीला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याची माहिती मिळू शकलेली नाही.

The plight of Nashik residents due to the rickshaw pullers’ protest

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *