7 चौकार, 28 षटकार ठोकले

दोहा :
भारत ’अ’ संघातर्फे आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने वादळी फलंदाजी केली आहे. वैभव सूर्यवंशीने यूएईविरोधात फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यूएईने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 249 धावा केल्या होत्या.
या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने अभिषेक शर्माच्या साथीने डावाची सुरुवात केली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. वैभवने 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले. या खेळीत वैभवने 28 षटकार आणि 7 चौकार मारले. वैभव सूर्यवंशीने 53 चेंडूंमध्ये 204 धावा केल्या.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत यूएईविरोधात बेबी बॉस वैभव सूर्यवंशीनं 52 चेंडूंमध्ये विक्रमी आणि ऐतिहासिक द्विशतक नोंदवले आहे. लिस्ट -क्रिकेटमधील सर्वांत वेगवान द्विशतक वैभवने स्वत:च्या नावावर नोंदवले आहे. वैभवने मैदानात सर्वत्र फटकेबाजी
केली.
जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांना टाकले मागे
या विक्रमी शतकासह वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वातील अनेक नामवंत आणि स्फोटक फलंदाजांना मागे टाकले आहे. लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आता तिसर्या स्थानावर घसरला आहे. या यादीत भारताच्या साकिबुल गनी याने चौथे स्थान पटकावले असून, भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
Suryavanshi’s blistering, record-breaking double century off 52 balls