एसटी संपाचा तिढा सुटला
मुंबई प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने आज दिले आहेत. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे सांगत त्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील एसटीची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने मध्यंतरी कंत्राटी वाहन चालक भरती केली होती कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत