शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

 

नाशिक : शहर परिसरात उपनगर, इंदिरानगर , देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनामुळे चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहेत. तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ४ लाख, ०९ हजार, २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. पहिली घटना
सुदेश कृष्ण चहल (वय ५४, रा. श्री हरी बंगला, प्लॉट क्र. ४, श्रीकृष्ण नगर लेन, ड्रीम सिटी जवळ, आगर टाकळी) यांच्या बंगल्याच्या दरवाज्याचा कडी कोंडा , कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत. बेडरुममधील कपाटातील सोन्याच्या दोन बांगड्या, चेन, अंगठी , कानातील रिंग असा एकूण दोन लाख १० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक चौधरी तपास करत आहेत. दुसरी घटना देवळाली कॅम्प पोलीस ठाणाच्या हद्दीत घडली आहेत.
भगवान टिकमदास कटारिया (वय ४८, फ्लॅट क्रमांक १२, रवी सोसायटी, लॅम रोड, देवळाली कॅम्प) यांच्या नॉव्हेल्टी स्टोअर्स ( मेन स्ट्रीट, एन. एन. गोवावाला बिल्डिंग, जुन्या बस स्टॅण्डजवळ देवळाली कॅम्प ) याच्या दुकानाच्या छताचा पत्रा व कौल काढून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. टेबलच्या ड्रॉवरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६० हजार रुपये लंपास केले. देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील सहायक उपनिरीक्षक पानसरे तपास करत आहेत.
तिसरी घटना इंदिरानगर पोलीस ठाणाच्या हद्दीत घडली आहेत.
रेखा शेषराव बाबीस्कर (वय ६२, रा. फ्लॅट क्रमांक ६, शिवदर्शन अपार्टमेंट, इंदिरानगर) यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत. बेडरुममधील कपाटाचे लॉकर्स तोडून १७ हजार रुपये रोख , सोन्याचा हार, मंगळसूत्र, अंगठी, रिंग, पेंडल, चांदीचे पैंजण, कडा असा एक लाख ३९ हजार २०० रुपयांचा ऐवज आणि धुळे येथील स्टेट बँकेची एक लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिटची मुळ प्रत लंपास केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वांजळे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *