नाशिक : इगतपुरी तालुक्यतील पिंपळगाव धाडगा येथे वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दशरथ दामू लोते आणि सुनीता लोते असे या दाम्पत्याचे नाव आहे.दोघेही गिर्हेवाडी येथे एका लग्नाच्या कार्यक्रमाला आले होते. वादळी पाऊस सुरू झाल्याने एका आंब्याच्या झाडाच्या आश्रयाला उभे असताना वीज कोसळली. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या मुली तेजस्विनी (7) सोनली (5) आणि गिर्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिर्हे हे जखमी झाले.ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पवार हवालदार धारणकर यांनी भेट दिली.