ठेंगोडा येथील तलाठी, मंडल अधिकार्‍यावर लाचप्रकरणी गुन्हा

ठेंगोडा येथील तलाठी, मंडल
अधिकार्‍यावर लाचप्रकरणी गुन्हा
तक्रारदाराकडे मागीतले पंधरा हजार
नाशिक : प्रतिनिधी
सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी पंचवीस हजारांची लाच मागून पंधरा हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविणार्‍या ठेंगोडा येथील तलाठी आणि मंडल अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
ठेंगोडा येथील तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव यांनी  मंडल अधिकारी संजय साळी यांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराकडे सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी पंचवीस हजारांची  लाच मागीतली होती. परंतु तक्रारदाराने पंधरा हजार देण्याची तयारी दर्शविली होती. तक्रारदाराने यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सापळा अधिकारी अनिल बडगुजर, हवालदार दीपक पवार,  प्रभाकर गवळी, पोलिस शिपाई संजय ठाकरे, चालक विनोद पवार, परशुराम जाधव यांनी तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

आरोग्य ते शेतीपर्यंतच्या कामगिरीचे मोदींकडून कौतुक

मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…

2 minutes ago

अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

13 minutes ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…

19 minutes ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्‍या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…

23 minutes ago

गोदाकाठी सामूहिक शंखनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…

33 minutes ago

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago