मनपाचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महाजन यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा

मनपाचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महाजन यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल महाजन व त्यांच्या पत्नी श्रीमती निशा महाजन यांच्यावर एक कोटी 31 लाख 42 हजार आठशे रुपयांची अपसंपदा जमा केल्याबद्दल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक महापालिकेत अग्निशमन अधिकारी असताना अनिल महाजन यांनी 22,10,1986 ते दिनांक 31 मे 2018 या सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्नापेक्षा एक कोटी 31 लाख 42 हजार 869 रुपये अपसंपदा जमा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने तसेच सदर अपसंपदा जमा करण्यासाठी त्यांच्या पत्नीने प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *