सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अभियंता नगर येथील पद्मश्री अपार्टमेंट मध्ये बंद घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील ५४ हजारांचे सोन्याचे दागिने घरफोडी करून लंपास केले आहे .याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडी ,सोन साखळी चोरी यासारखे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरटे जणू पोलिसांना खुले आवाहन देत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता नगर परिसरात रहाणारे निळकंठ गंगाधर विरगावकर (वय ५९, रा. पद्मश्री प्लाझा अभियंतानगर कामटवाडे) . हे दिनांक १८ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान पुणे येथे त्यांच्या मुलाकडे पती-पत्नी दोघेही गेले होते. त्यांनी घरी आल्यानंतर बघितले असता त्यांच्या घराचा कडी कोंडा तुटलेला दिसला. यावेळी लोखंडी कपाटाच्या दरवाजा तोडून त्यातील सोन्याचा नेकलेस, अंगठी, कानातले असे एकूण अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केले होते. एकूण ५४ हजार रुपये किंमतिचा मुद्देमाल या घरफोडीत चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस करीत आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी तसेच घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशानंतर पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली त्सानंतर त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्यकडे पदभार दिला होता परंतु पंधरा ते वीस दिवसानंतर अंबड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुनिल पवार यांची वर्णी तर लागली खरी परंतु हद्दीतील वाढती गुन्हेगारी ,घरफोडी सोनसाखळी चोरीच्या घटना कमी होण्या एैवजी दिवसेंदिवस वाढतच असुन नव्याने पदभार स्वीकारणा-या पोलिस निरीक्षक पवार यांच्या समोर मोठे आवाहन असुन आता ख-या अर्थाने पोलिसांनी रस्त्यावर उतरुन गुन्हेगारीचा बिमोड न केल्यास भविष्यात हद्दीतील गुन्हेगारी कमी करणे मोठे जिकरीचे ठरणार आहे यासाठी मॉरल पोलिसिंगची गरज असुन त्यादृष्टीने पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी पावले उचलण्याची गरज आहे