नाशिक

अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा

उसाचे पैसे थकवल्याप्रकरणी शेतकर्‍यांची मागणी

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागातील कोळगाव, देवगाव, सारोळे थडी, करंजी खुर्द, तामसवाडी, तारुखेडले परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे संचलित अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल कंपनीकडे ऊस पुरवठा करून चार ते पाच महिने उलटून गेले, तरी देयके न मिळाल्याने संताप व्यक्त केला आहे.
संबंधित कंपनीकडून शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत शेतकर्‍यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देत कंपनीच्या मालक व व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन 2025-26 च्या गाळप हंगामात डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगम व शेतकी अधिकारी अजित गुळवे यांनी गावोगावी भेटी देऊन शेतकर्‍यांकडून प्रतिटन 3200 रुपये दराने ऊस खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अनेक शेतकर्‍यांनी आपल्या उसाचा पुरवठा संबंधित कंपनीकडे केला. मात्र, उसाची वाहतूक व गाळप पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना पैसे मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. शेतकर्‍यांनी अनेक वेळा कंपनीचे अधिकारी व व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, बँक कर्ज, शेती खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल कंपनीच्या मालक व व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा तसेच थकीत ऊस बिले तातडीने मिळवून द्यावीत, अशी मागणी निवृत्ती गारे पाटील, गजानन घोटेकर, शंकर कोंडाजी घोटेकर, प्रताप गवळी, प्रसाद गवळी, राजेंद्र कदम, रेवनसिद्ध लोहारकर, जयवंत लोहारकर, मंगेश फापाळे, पंकज दगडे, गोरक्षनाथ नागरे, जनार्दन नागरे, चंद्रकांत नागरे, नितीन सानप, रामदास गवळी, संदीप डोंगरे, विजय घोटेकर, नंदू वाघ, आत्माराम वाघ, दशरथ घोटेकर, मयूर गवळी, रावसाहेब घोटेकर, बाबासाहेब वाघ, हनुमान दंडाळ, पंढरीनाथ नागरे, लक्ष्मीकांत गंभीरे आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

 

A case of fraud should be registered against Ashtalakshmi Sugar Ethanol Company.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

3 minutes ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago