नाशिक

गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणारा सराईत आरोपी जेरबंद

सिडको : विशेष प्रतिनिधी
गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणार्‍या सराईत आरोपीला भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली. श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे (वय 28, रा. पाटील गल्ली, भद्रकाली, जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 37 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त
करण्यात आली.
भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुंडा रजिस्टरवरील आणि मागील दोन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी श्रीजय खाडे हा शितळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ कट्टा घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार सतीश साळुंके, कय्युम सय्यद, पोलीस शिपाई नीलेश विखे आणि अविनाश थेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Villager arrested for carrying live cartridges, innkeeper accused arrested

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago