नाशिक

लढाऊ वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंगआउट परेड दिमाखात

नाशिक ः प्रतिनिधी
जहाँ डाल डाल पे चिडीया करे बसेरा…
वो भारत देश है मेरा, जय हो आदी अशा एकापेक्षा एक देशभक्तिपर गीतांची बँड पथकाने वाजविलेल्या धूनवर कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या 43 व्या लढाऊ वैमानिकांच्या तुकडीसह एव्हिएशन प्रशिक्षकांच्या 42 व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात पार पडला. विविध उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली. लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार (सेना पदक महासंचालक) आणि आर्मी एव्हिएशनचे कॉर्प्सचे कर्नल कमांडंट यांच्या अध्यक्षतेखाली लष्करी शिस्त, परंपरा व प्रशिक्षणातील उत्कृष्टतेचे यावेळी वैमानिकांनी दर्शन घडविले.

या प्रशिक्षणात नेपाळ, नायजेरिया येथील दोन विदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यांना प्रत्येकी आर्मी एव्हिएशन विंग्ज प्रदान करण्यात आले. यावेळी एका महिला अधिकार्‍यालाही विंग्ज प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स सिरियल 43, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स सिरियल 42, बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राप्ट सिस्टिम (बाह्य पायलट) सिरियल 04 आणि क्वालिफाइड फ्लाईंग इन्स्ट्रक्टर (बाह्य पायलट, इंटर्नल पायलट आणि ऑब्झर्व्हर) सिरियल 04 यांचे एकत्रित पासिंगआउट परेड आयोजित केली होती. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांनी अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी या अधिकार्‍यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सैनिकी स्कूलचे विद्यार्थी, अतिथी उपस्थित होते.
कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये सन 2003 मध्ये फक्त तीन वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. कॅट्स प्रशिक्षण वर्षात 17 अभ्यासक्रम शिकविण्यात येतात.
तरुण वैमानिकांनी चालविणार्‍या मशिनची क्षमता आणि मर्यादांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. सर्व मोहिमा उड्डाण सुरक्षेच्या व्यापक छत्रात पार पाडल्या पाहिजेत. लष्करी उड्डाण नेहमीच जास्त जोखमीनेे असते. या वस्तुस्थितीची जाणीव असणे आवश्यक आहे, असा सल्ला नांबियार यांनी दिला.
याप्रसंगी उपस्थित विजेत्या अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. ही परेड त्यांच्या जीवनातील स्वप्नपूर्ती ठरल्याची भावना व्यक्त केली. परेडचे नेतृत्व सुभेदार मिश्रा यांनी केले. मिश्रा यांनी देश-परदेशातही शिस्तबद्ध संचलन केल्याचे नमूद केले. देशभक्तिपर गीतांचे बॅन्ड पथकाद्वारे संचलन करण्यात आले.

भारतीय लष्कराची प्रमुख प्रशिक्षण संस्था असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) लढाऊ वैमानिकांना नवतंत्रज्ञानाद्वारे देण्यात येणार्‍या प्रशिक्षणात फ्लाईंग सिम्युलेटरचा समावेशासह ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्सच्या प्रशिक्षणार्थींना सिम्युलेटर प्रशिक्षण देण्यासाठी एचएएलसोबत समन्वय सुरू असल्याचे आर्मी एव्हिएशनचे महासंचालक कर्नल कमांडंट, सेवा मेडल लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी सांगितले.

युद्धभूमीवरचा थरार
धु्रव, चीता, चेतक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवानांना मायभूमीवर यशस्वीरीत्या उतरवणारे दृश्य, प्रत्यक्षातील युद्धभूमीवरचा दुष्मनांशी होणारा सामना उपस्थितांच्या काळजाचा थरकाप करणारे ठरले. त्याचबरोबर मायभूमीच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणार्‍या जवानांचे कौतुक आणि अभिमानाने ऊर भरून आलेल्या प्रत्येक उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारे क्षण गांधीनगर येथे आयोजित कॉम्बॅट एव्हिएशन कोर्स 43, इंटर्नल पायलट कोर्सच्या चौथ्या दीक्षान्त सोहळ्याप्रसंगी अनुभवले. यावेळी प्रत्यक्ष युद्धभूमीतील थरार याचि देही याचि डोळा उपस्थितांना अनुभवता आला. नुकतेच ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले होते. यावेळी हेक्स ड्रोेनसह इतर ड्रोनचा वापर करून जवानांना मदत, टेहळणी आदी कशा प्रकारे केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. लेफ्टनंट जनरल नांबियार यांनी, नवीन वैमानिक आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व त्यांच्या सर्मपणाचे कौतुक केले. शांततेच्या काळात आणि लढाऊ परिस्थितीत आर्मी एव्हिएशनच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. तांत्रिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

महिला अधिकार्‍यांची संख्या वाढली
यंदाच्या पासिंगआउट परेडला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे चित्र होते. भारतीय लष्कराच्या कॉर्प्समधील वरिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या महिलांनी ऑपरेशन सिंदूरच्या बचाव आणि मदतकार्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. भारतीय लष्करात महिलांची संख्या वाढत असल्याचे कॅट्सच्या पासिंगआउट परेडमधील ईशा ठाकूर आणि जगमित कौर, तसेच निकिता या अधिकार्‍यांच्या प्रवेशावरून सिद्ध होत आहे.

Gavkari Admin

Recent Posts

मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल

राज्यात सात दिवसांत दाखल नवी दिल्ली ः महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असताना अरबी समुद्रात…

4 hours ago

56 तासांनंतर जिंदाल आग आग आटोक्यात

इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर 56…

5 hours ago

खरीप हंगामासाठी पैसे नसल्याने बळीराजा हतबल

यांत्रिकीकरणामुळे मशागत खर्चात वाढ, सोसायटीतून कर्जपुरवठा करावा अस्वली स्टेशन : प्रतिनिधी भाताचे आगार समजल्या जाणार्‍या…

5 hours ago

ठाणगावात चोरी करणारा चोरटा गजाआड

सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सिन्नर ः प्रतिनिधी तालुक्यातील ठाणगाव येथे घराच्या बंद दरवाजाची कडी उघडून…

5 hours ago

अवकाळीचा 600 हेक्टर पिकांना तडाखा

दिंडोरी तालुक्यातील शेतकर्‍यांवर संकट : कांदा पिकाचे नुकसान दिंडोरी : प्रतिनिधी एप्रिल आणि मे महिन्यांत…

5 hours ago

बॉबीडॉन-काशीडॉन ठरले युवा हिंदकेसरी

गणेश बनकरांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत दिक्षी : प्रतिनिधी निफाड तालुक्याचे युवा नेते गणेश बनकर…

5 hours ago