दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जण ठार

 

दिंडोरी येथील अपघातात सात ठार
अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश

दिंडोरी : प्रतिनिधी

दिंडोरी कळवण रस्त्यावरील शिवनेरी हॉटेल व संस्कृती लोनच्या समोर अपघातात सात ठार झाले असून अपघातामध्ये
तीन महिला तीन पुरुष व लहान बालकांचा मृतांमध्ये समावेश असून मोटरसायकल व अल्टो यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्री  सुमारास मोटरसायकल व अल्टो कार यांचा अपघात झाला असून अल्टो कार मधील सात प्रवासी ठार झाले आहे तर मोटरसायकल चालवाणारे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.मृत हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील असल्याचे समजते. दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शना खाली सुरु असून दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची माहितीची नोंद करण्यात आली आहे .

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago