खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज संवाद मेळावा

 

नाशिक : प्रतिनिधी

अगामी लोकसभा निवडणुकांची अचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना शिवसेना युवा नेते खा. डाॅ.श्रीकांत शिंदे उद्या दिनांक 12 रोजी नाशिक दौर्‍यावर येत आहे. या दौर्‍यात ते नाशिक जिल्हयातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. पालकमंत्री  दादाजी भुसे, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी हे देखील यावेळी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. त्याचप्रमाणे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते  होणार आहे.  त्यांच्या दौर्‍याला नाशिक जिल्हयातील पेठ तालुक्यातील काहांडोळपाडा येथून सकाळी 10.30 वाजता सुरूवात होणार असून, मोहपाडा ते देवळाचा पाडा रस्त्यावर दमणगंगा नदीवरील पूलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता सुरगाणा नगर पंचायत येथे आठ कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे सुरगाणा शहरासाठी रूग्णवाहिका, अग्निशमन दल वाहन, घनकचरा संकलनासाठी ट्रॅक्टर, इतर वाहने यांचे लोकार्पण सोहळा होणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी 4.30 वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे युवासेनेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या  पार्श्वूभमिवर हा दौरा होत असल्याने नाशिक लोकसभेच्या जागेबाबत खा. श्रीकांत शिंदे हे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरून स्थानिक शिवसेना आणि भाजपा नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत नाशिकची जागा कोणाला असणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी प्रत्येकजण नाशिक लोकसभेवर दावा करत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक लोकसभा शिवसेनाच लढवणार असे ठामपणे सांगितले पण तरीही स्थानिक भाजप नेते जागेवर दावा करीत आहे. या पार्श्वभूमिवर खा. डाॅ.श्रीकांत शिंदे काही बोलणार का? हे पाहावे लागेल.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

भाजीपाला खरेदीसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…

12 minutes ago

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

20 minutes ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

27 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

32 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

43 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

55 minutes ago