जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला

आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी

दिंडोरी : प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील मातेरवाडी जऊळके रस्त्यावर आज सकाळी 11 च्या सुमारास आक्राळे येथील गावातुन जाणाऱ्या वऱ्हाडाचा टेम्पो  उलटल्यानंतर आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी झाले असून या ग्रामस्थांना ॲम्बुलन्सने पिंपळगाव येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की दिंडोरी तालुक्यातील आक्रळे येथील ग्रामस्थ जऊळके येथे लग्नाला आयशर मध्ये जात असताना मातेरवाडी जऊळके रस्त्यावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम चालू होते या रस्त्यावर साइडपट्ट्या भरलेल्या नसल्यामुळे समोरून गाडी आल्याने वऱ्हाड्याच्या आयशर  ड्रायव्हरने साईडला गाडी घेत असताना रस्त्याच्या कडेला चाक उतरल्याने गाडी उलटली..या अपघातात आठ ते नऊ महिला व पुरुष जखमी झाले असून यामध्ये संग्राम डंबाळे,वनिता डंबाळे,अलका डगळे,सुनिता कोरडे,रामनाथ आचारी,सविता आचारी,अलका बदादे, सुनीता बेंडकुळे,गायत्री पवार हे जखमी झाले. या जखमींना ॲम्बुलन्सने पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यावेळी अपघाताच्या ठिकाणी जखमींना मदत करण्यासाठी माजी आमदार धनराज महाले हे पण उपस्थित होते यावेळी माजीआमदार धनराज महाले यांनी सिमेंट काँक्रीट रस्ता करणाऱ्या ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

10 hours ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

2 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

2 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

2 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

2 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

3 days ago