नाशिक

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण

इगतपुरी : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग लाभदायी ठरणार आहे. राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इगतपुरी येथील समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (दि. 5) मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अन्न व प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे, आमदार सरोज अहिरे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड, अपर सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आमचे 2014 नंतर सरकार आल्यावर जे स्वप्न आम्ही पाहिले, ते पूर्ण झाले. हा महामार्ग नसून, समृद्धी करणारा आहे. या महामार्गाला 24 जिल्हे जेएनपीटीसोबत जोडले असून, लवकरच वाढवण बंदराशी जोडला जाईल. देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले, आज शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा राज्यातील गेमचेंजर प्रकल्प आहे. या महामार्गाला जवळपास 392 गावे जोडली आहेत. हा रस्ता नसून, कृषी समृद्धी प्रकल्प व पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. शेतकर्‍यांना याचा फायदा झाला असून, 33 लाख झाडे या रस्त्यावर लावणार आहोत. आता मुंबई, नागपूर अधिवेशनाला लोक या समृद्धी महामार्गावरून येतील.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, आज जागतिक पर्यावरण दिन असून, कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन सर्वांना मार्गदर्शन केले. यावर्षी आम्ही 10 कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 25 कोटी वृक्ष लावण्याचा आमचा ध्यास आहे. समृद्धी महामार्गाला सुरुवातीला शेतकर्‍यांनी विरोध केला, मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जमिनींचे दर जाहीर केल्यावर विरोध संपला. देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला सुरुवात केली आणि त्याच देवेंद्रजींनी शेवट केला. कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, उदय जाधव, युवानेते संजय खातळे, पांडुरंग वारुंगसे, सुनील जाधव, संपत वाजे, दिलीप जाधव यांनी केले.
दरम्यान, लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वत: या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस /-…4

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये
10 जिल्हे, 26 तालुके,  392 गावे 701 किलोमीटरचा रस्ता पहिला टप्पा 520 किमी दुसरा टप्पा 80 तिसरा टप्पा 25 अंतिम टप्पा 76 25 इंटरेचेंज रस्ते 8 किलोमीटरचा सर्वांत मोठा बोगदा इगतपुरी ते कसारा 8 मिनिटांत जाणार कसारा घाटातील वाहतूक कोंडी कमी होणार समृद्धी महामार्गात 5 दुहेरी बोगदे दोन्ही मार्ग पकडून एकूण लांबी 21.46 किलोमीटर इगतपुरी येथील बोगद्याची लांबी 8 किलोमीटर रुंदी 17. 61 मीटर उंची 9.12 मीटर अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा 8 किलोमीटरमध्ये 31 हजार रोपांची लागवड 200 मेगावॉट ऊर्जा होणार आहे.

असा आहे  समृद्धी महामार्ग…

55 हजार 300 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग साकारला आहे. 701 किलोमीटर असलेल्या या महामार्गाला वन्यजीव वाचविण्यासाठी 317 लहान पूल, 229 अंडरपास, 59 बोगदे, देशातील सर्वांंत मोठा बोगदा हा इगतपुरीत आहे. 224 अंडरपास, 25 इंटरेचेंज आहे. 60 टेम्परेचर असेल, तर अ‍ॅटोमॅटिक पाणी पडणार आहे. गॅस देण्याचे काम यापुढे होणार आहे. धार्मिक स्थळे जोडण्याचे काम केले आहे. या महामार्गावर 33 लाख वृक्षारोपण होणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago