लेकीच्या मासिक पाळीचा साजरा केला महोत्सव

अंधश्रद्धांच्या विरोधात चांदगुडे दाम्पत्याचा उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी
मासिक पाळी या विषयावर संकोचाने बोलले जाते. त्यावर चर्चा होत नाही. त्याबाबत बर्याच अंधश्रद्धा व गैरसमजुती आहे. एखाद्या घरातील लेकीला मासिक पाळी सुरू होणे म्हणजे पारंपरिक समजुती व पुर्वग्रहामुळे तिच्या मनात अपराधीपणाचा भाव निर्माण होतो. पण या सर्वांना छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दांपत्यांनी केले आहे. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये, समाजाचा मासिक पाळीबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. यासाठी चांदगुडे दांपत्यांनी मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले. या क्रांतिकारी उपक्रमाची समाजमाध्यमातून राज्यभर चर्चा होत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त कृष्णा व ऍड. विद्या चांदगुडे यांची तेरा वर्षाची मुलगी यशदा हिला परवा प्रथमच मासिक पाळी आली. त्यानिमित्ताने महामार्गावरील एका हॉटेलमध्ये तिच्या प्रथम मासिक पाळीचे आयोजन करण्यात आले होते.  ’आता माझी पाळी,मीच देते टाळी’ हे घोषवाक्य घेऊन उपक्रम राबवला गेला.मासिक पाळी या विषयावर समाजबंध संस्थेचे कल्पेश जाधव यांनी व्याखानातुन जनजागरण केले. या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी या महोत्सवात कोष हा लघुपट दाखवला गेला. मासिक पाळी या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता यावेळी म्हटल्या गेली.संत वाड्मयातील रचनांमध्ये सापडणार्‍या अभंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. महिला व पुरुषांचा मासिक पाळी या विषयावर चर्चासत्र झाले.यात डॉ. टी.आर. गोराणे,महेंद्र दातरंगे,कोमल वर्दे, जयश्री पाटील ,ऍड विद्या चांदगुडे, प्रथमेश वर्दे आदींनी सहभाग नोंदवला.
या वेळी मासिक पाळी या विषयावर असलेली प-पाळीचा ही पुस्तिका वितरित केल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. उपस्थितांनी मनातील अंधश्रद्धा दूर झाल्याची भावना व्यक्त केली. दीडशे निमंत्रित स्नेहजन यावेळेस उपस्थित होते.
सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले. तर आभार यांनी ऍड. समीर शिंदे यांनी मानले. स्नेहजनांनी आणलेल्या सॅनेटरी पॅडचे वस्तीतील गरजु मुलींना वाटप करण्यात आले.

समाजात मासिक पाळी संदर्भात खूपच गैरसमजुती,अंधश्रद्धा आहेत. अंनिसमध्ये काम करतांना त्याबाबत आम्ही प्रबोधन करत असतो.आज आमच्या मुलीला प्रथमच मासिक पाळी आल्यानंतर प्रबोधनासोबत प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याची गरज होती.म्हणून प्रथम मासिक पाळीचे नियोजन आम्ही केले. त्यातून लोकांना सकारात्मक दृष्टिकोन मिळाला
– कृष्णा चांदगुडे,
यशदाचे वडील

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago