महाराष्ट्र

पावसाचे जोरदार कमबॅक

नाशिक : अश्विनी पांडे
तब्बल दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. दुपारपर्यंत कडक उन्हाची अनुभूती घेतलेल्या नाशिककरांची सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची, वाहनधारकांची झाली. ठिकठिकाणी पावसाचे तळे साचले. महापालिकेच्या राजीव गांधी भवनजवळही मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
अचानक झालेल्या पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे गोदावरीला पूरही आला होता. मात्र गेल्या काही दिवासापासून शहरात पावसाची उघडडीप सुरू होती. ऐन पावसाळ्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक उन्हाच्या झळांनी हैरान झाले होते. मात्र काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या झळा सोसणार्‍या नाशिककरांना दिलासा मिळाला.

 

गेल्या काही दिवसात वातावणात होणार्‍या सततच्या बदलामुळे मात्र आरोग्याच्या समस्येत चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. शहरात हिव तापाने आजारी पडणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बदल्यात वातावणात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नाशिककरांसमोर निर्माण झाले आहे. श्रावण महिन्यात सतत ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. मात्र या ऊन पावसाचे आरोग्यावर परिणाम होत असल्याने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काल दुपारनंतर झालेल्या पावसानंतर शहरातील काही भागात विजेचा लंपडाव सुरू होता. तर अनेक भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण जात होते. येत्या काही दिवस शहरात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या चात ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago