सातपूर: प्रतिनिधी
पाईपलाईन रोडजवळील णेश नगर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 8 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मृत नविका नेरकर (वय 8) स्विमिंग करून आजी सोबत घरी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे
आजी सोबत दुचाकीवरून जात असलेल्या नविका नेरकर यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर पडली आणि ट्रकचं चाक थेट तिच्या डोक्यावरून गेले. या भीषण अपघातात नविकाचा जागीच मृत्यू झाला. . घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करत ट्रक जप्त केला असून ट्रक ड्रायव्हर फरार झालेला आहे बारा चाकी टाटा ट्रक असून एम. एच. १७ बी. डी ५००५ हा नंबर असून त्याच परिसरात मॉल असल्यामुळे परिसरात नेहमी ट्राफिक जाम होते. वेळोवेळी महानगरपालिकेला तसेच संबंधित प्रशासनाला परिसरातील नागरिकांच्या वतीने स्पीड बेकर टाकण्यासाठी अनेक वेळा निवेदन देखील दिली आहे मात्र या निवेदनाची प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची नोंद किंवा दक्षता घेतली जात नाही या संपूर्ण घटनेला मनपा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे महेंद्र शिंदे यांनी केला आहे
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून संबंधित फरार ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…