निवृत्तिनाथ महाराजांचे पहिले गोल रिंगण; हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित
सिन्नर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या आषाढी वारीतील पहिल्या गोल रिंगणासाठी दातली गाव सज्ज झाले आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा सोहळा शनिवारी (दि. 4) दुपारी चार वाजता भक्तिमय वातावरणात पार पडणार असून, हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत दातलीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
दातली येथील लक्ष्मण रामभाऊ शेळके आणि कैलास रामभाऊ शेळके यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे चार एकर जागेत रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी सलग सहाव्या वर्षी गोल रिंगण सोहळा पार पडत आहे.
शुक्रवारी संत निवृत्तिनाथ महाराजांचा रथ आणि पालखी पावसाच्या सरी झेलत पास्ते घाटातून पास्ते गावात दाखल झाली. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘निवृत्तिनाथ महाराज की जय’च्या जयघोषात ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. वारकर्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा तसेच विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पालखी सोहळा मुक्कामासाठी लोणारवाडी येथे विसावला. तेथे वारकर्यांसाठी पुरणपोळीचा बेत आखण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता सिन्नर शहरात वारीचे आगमन होईल. सिन्नरकरांचे स्वागत स्वीकारून हा पालखी सोहळा कुंदेवाडी येथे दुपारचे भोजन घेऊन दातलीच्या रिंगण सोहळ्याकडे मार्गस्थ होईल. त्यानंतर रात्री खंबाळेत मुक्काम होईल. आज होणार्या गोल रिंगण सोहळ्यात माउलींच्या अश्वांची धाव आणि वारकर्यांचे पारंपरिक खेळ हे विशेष आकर्षण ठरणार आहे. सोहळ्यासाठी मैदानाचे सपाटीकरण, वॉटर फ्रूट, चार मंडप, चरणसेवा उपक्रम, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
यंदा दोन जेसीबीच्या माध्यमातून पालखीवर फुलांची उधळण करून वारकर्यांचे स्वागत करण्यात येणार असून, हा क्षण भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी आणि पालखी सोहळाप्रमुख माधव महाराज राठी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दातलीकडे रवाना होत आहेत.
A grand celebration of devotion at Datli today.
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…