ब्राह्मणगावला शाळा इमारतीवर कोसळले झाड
लासलगाव : वार्ताहर
ब्राह्मणगाव (विंचूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि. 3 जुलै) दुपारी एकच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. शाळेच्या पाठीमागील कडुनिंबाचे जुने व मोठे झाड थेट इमारतीवर कोसळले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी शाळेच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे.
या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून, एकूण 31 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असतानाच परिसरात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. याच दरम्यान पाठीमागील कडुनिंबाचे मोठे झाड अचानक वर्गाच्या छतावर कोसळले. झाड पडल्याने अतिशय भयानक आणि मोठा आवाज झाला.
या अचानक झालेल्या आवाजामुळे चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षक प्रचंड घाबरले. मात्र, शिक्षकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत सर्व 31 विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वर्गाबाहेर काढले. शाळेच्या छताचे पत्रे नवीन असल्यामुळे झाड थेट वर्गात घुसले नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
झाड कोसळल्याचा आवाज एवढा मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी घाबरून थेट शाळेकडे धाव घेतली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुरक्षित असले, तरी झाड पडल्यामुळे शाळेच्या नवीन पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
The students’ lives were saved thanks to the teachers’ presence of mind.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…