सातव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

इंदिरानगर : वार्ताहर
इमारत बांधकामाच्या वेळी सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडाळा गावाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आय. एन. डी.डेव्हलपर्स, सिग्निफिकँट इमारत सोसायटीच्या मागे, गरीब नवाज कॉलनी, वडाळा गाव येथे किस्कु उर्फ बबलू मुरमु ठाकुर (वय 54 वर्षे, रा. बागनवारी, प.बंगाल) हे बांधकाम करताना सातव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या दुखापतीत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ईश्वर रघुनाथ शिंदे (वय 32 वर्षे, रा. गुरू ज्योती सोसायटी, दत्त मंदिर नाशिकरोड) यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निखिल बोंडे करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *