नाशिक

रमजाननिमित्त मालेगावच्या रंगीत सुत्तरफेणीची मोठी आवक

जुने नाशिक : वार्ताहर
पवित्र रमजानपर्वास सुरुवात झाली असून, शहर परिसरातील मुस्लिमबांधव मोठ्या प्रमाणावर रमजानचे निर्जळी उपवास करीत आहेत. उपवास धरताना पहाटे सहेरी करून सायंकाळी सूर्यास्तावेळी इफ्तारी करण्याची पद्धत आहे. दरम्यान, सहेरी व इफ्तारीचे खाद्यपदार्थ विक्रीची अनेक दुकाने संपूर्ण परिसरात थाटण्यात आली आहेत.
याशिवाय येथील बाजारपेठेत मालेगावची विविध प्रकारची रंगीत सुत्तरफेणी, सौदी अरेबियातील विविध प्रकारचा खजूर, अहमदाबाद येथील शेवया, मुंबईतील फेमस फालुदा तसेच चिकन कबाब, मटण कबाब, सीग कबाब, चिकन मटण समोसे, चिकन काढी कबाब, पालक भजी, खमण यांसारख्या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटण्यात आली आहेत.
दरम्यान काल (दि.22) सायंकाळी रमजान पर्वातील चार उपवास पूर्ण झाले. रमजाननिमित्त दूध बाजार, महात्मा फुले मार्केट, मौला बाबा तालीम, कादर मार्केट, दादासाहेब फाळके रोड, चौक मंडई, सारडा सर्कल, बागवानपुरा, कथडा, मुलतानपुरा, बडी दर्गाह, वडाळा रोडवरील आयेशा मशीद परिसर आदी भागांत मोठ्या प्रमाणावर तात्पुरते बाजार भरले आहेत. परंपरेप्रमाणे दूध बाजार ते फुले मार्केट परिसर येथे रमजानचा विशेष बाजार सजला असल्याने हा रस्ता दररोज संध्याकाळी वाहनांसाठी बंद केला जात आहे. या भागात सर्वधर्मीय व्यापार्‍यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. रमजानचे मिळणारे विशेष खाद्यपदार्थ घेण्यासाठीदेखील सर्वधर्मीय ग्राहक येथे पाहायला मिळत आहेत. सुत्तरफेणीच्या दरात यावर्षी थोडीफार वाढ झाली असून, यावर्षी दीडशे रुपये किलो दराने ती विकली जात असल्याची माहिती दूध बाजारातील मखदुम ड्रायफ्रूटचे संचालक हाजी युनूस तांबोळी यांनी दिली.

A large influx of colorful Suttarfeni from Malegaon on the occasion of Ramadan

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

2 hours ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

7 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

7 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

7 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

8 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

8 hours ago